नव्या शैक्षणिक वर्षात शाळांना 76 दिवस सुट्टी ! शाळांचे कामकाज 238 दिवस चालणार

Spread the love

पूणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 2023-24 हे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होणार आहे. या वर्षात शाळांना तब्बल 76 दिवस सुट्टी मिळणार आहे. यात विविध सण व उत्सवाच्या तब्बल 27 दिवसांच्या सुट्टयांचा समावेश आहे.

दरम्यान शाळांचे कामकाज 238 दिवस सुरु राहणार आहे.

दरवर्षी नवे शैक्षणिक वर्षाचे सुट्टयांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. यंदाही पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रथम सत्र हे 15 जून 2023 ते 7 नोव्हेंबर 2023 असे असणार आहे. त्यानंतर 8 ते 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत 10 दिवाळी सुट्टी असणार आहे. द्वितीय सत्र 22 नोव्हेंबर 2023 ते 1 मे 2024 पर्यंत असेल. उन्हाळी सुट्टी 2 मे ते 14 जून 2024 अशी 37 दिवस सुट्टी मिळणार आहे.

शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ या सारख्या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीचे समायोजन करता येणार आहे. शैक्षणिक वर्षात एकुण सुट्टया 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शाळांचे कामाचे दिवस किमान 230 असलेच पाहिजेत. मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील 2 स्थानिक सुट्टया निश्‍चित करुन त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवाव्या लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्‍चित केलेल्या स्थानिक सुट्टया व शासन स्तरावरुन जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टया शाळांनी घेणे बंधनकारक आहे.

चार सार्वजनिक सुट्ट्या रविवारीच यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार सार्वजणिक सुट्ट्या रविवारीच आल्या आहेत. यामध्ये 15 ऑक्‍टोबर – घटस्थापना, 12 नोव्हेंबर-लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, 14 एप्रिल-डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती, 21 एप्रिल- महावीर जयंती यांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांच्या या चार सार्वजनिक सुट्ट्या कमी झाल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page