राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. याचीच प्रचिती आता आली आहे. एकाच वेळी तब्बल 8 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे….
मेघालय प्रतिनिधी- राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधीकधी एखाद्या नेत्याला अनपेक्षितपणे मंत्रिपद मिळते तर कधी एखाद्या नेत्याला मंत्रिपदाची खुर्ची खाली करावी लागते. सध्या मात्र मेघालयात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. गेल्या 11 वर्षांत मेघालयमध्ये जे घडलं नाही, ते आता पाहायला मिळत आहे. इथे मंत्री धडाधड राजीनामे देत आहेत. या राजीनाम्यांचं नेमकं कारण काय? असं आता विचारलं जात आहे.
मेघालयमध्ये नेमकं काय घडत आहे?…
मेघालयमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. इथे भाजपा सत्तेत सहभागी असलेल्या युतीमधील 12 पैकी 8 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये एनपीपी, यूडीपी, एचएसपीडीपी आणि बीजेपी पक्षाच्या मंत्र्यांचा समावेश आहे. यात एनपीपीचे अम्पारीन लिंगदोह, कॉमिंगोन यम्बोन आणि रक्कम ए. संगमा यांचा तसेच यूडीपी पक्षाचे अबू ताहीर मंडल, यूडीपीचे पॉल लिंगदोह आणि किरमेन शायला, एचएसपीडीपी पक्षाचे शकलियार वारजरी आणि भाजपाचे के ए एल हेक यांचा समावेश आहे. मेघालयात मंत्रिमंडळ विस्तार होत असल्याने या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

एकूण 8 मंत्र्यांचे राजीनामे…
मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टीचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व कोनराड संगमा यांच्याकडे आहे. संगमा यांच्या सरकारमध्ये अन्य पक्षांचाही समावेश असून या सर्व पक्षांच्या युतीला मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्स असे म्हटले जाते. 2023 सालची निवडणूक झाल्यानंतर ही युती तयार झाली होती. एकूण साठ जागांसाठी 2023 सालची ही निवडणूक पार पडली होती. संगमा यांच्या सरकारमध्ये एकूण 12 मंत्री होते. आता यातील 8 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
राजीनामा देण्याचे नेमके कारण काय?…
अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे मेघालयच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे या विस्ताराअंतर्गत काही नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. युतीतील सर्वच पक्षांना प्रतिनिधीत्त्व मिळावे आणि युती अबाधित राहावी यासाठी हा मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यांचे खाते नव्या नेत्याला दिले जाईल.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर