‘आय लव्ह मोहम्मद’वरून दुर्गामाता दौड:अहिल्यानगरच्या कोटला परिसरातील घटना, मुस्लिम समाज आक्रमक; रास्ता रोको, लाठीचार्ज…

Spread the love

अहिल्यानगर- रस्त्यावर ‘आय लव्ह मोहम्मद’ रांगोळी काढून त्यावरून दुर्गामाता दौडचे आयोजन केल्यामुळे अहिल्यानगरातील मुस्लिम समाज फारच आक्रमक झाला आहे. त्यांनी या प्रकरणी पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एका हिंदुत्त्ववादी संघटनेने अहिल्यानगर लगतच्या कोटला परिसरात दुर्गामाता दौडचे आयोजन केले होते. या दौडमध्ये रस्त्यावर कथितपणे ‘आय लव्ह मोहम्मद’ असा उल्लेख असलेली रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून ही दौड पुढे नेण्यात आली. ही गोष्ट समजताच शहरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी त्यांच्यावरच लाठीमार केला. त्यांना पिटाळून लावले. त्यानंतर संतप्त समाज रस्त्यावर उतरला.

आंदोलकांचा पुणे – संभाजीनगर मार्गावर रास्तारोको…

आंदोलकांनी पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोठला परिसरात रास्तारोको केला. या रास्तारोकोमुळे वाहनांची पुरती कोंडी झाली. यावेळी सरकारविरोधात जोरदार नारेबाजीही करण्यात आली. पोलिसांनी याठिकाणी वेळीच धाव घेत हा मार्ग मोगळा केला. यावेळी त्यांनी सौम्य लाठीमारही केला. यावेळी त्यांची आंदोलकांशी किरकोळ चकमकही झाली. पण अखेर त्यांना जमावावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या येथील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून समाजकंटकांवर गुन्हा…

दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी वेगवान कारवाई करत रांगोळी काढणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्या घेण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे अहिल्यानगरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे.

पोलिस अधीक्षकांनी दिली घटनाक्रमाची माहिती…

अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोनाथ घार्गे यांनी या प्रकरणी एका समाजकंटकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवर रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ज्यांनी रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतरही काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोटला येथे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यांना विनंती केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

मी सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आवाहन करतो की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अहिल्यानगर शहरात शांतता आहे. दगडफेक करणाऱ्यांना समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे पोलिस अधीक्षक म्हणाले.

कुणी आयोजित केली होती दुर्गामाता दौड?

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कोटला गावातील दुर्गामाता दौड ही संभाजी भिडे यांच्या नेतृत्वातील हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आली होती. या संघटनेतर्फे नुकतीच सांगलीतही अशीच दौड आयोजित करण्यात आली होती. तिथे बोलताना भिडे यांनी नवरात्रीत दांडिया खेळणारे सर्वजण हांडगे असल्याची तिखट टीका केली होती.

ते म्हणाले होते, आम्हाला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको आहे. आम्हाला हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी विस्कटलेली नवरात्र दुरुस्त करण्याची शपथ घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो. शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा आरंभ होता.

पण आपण गणपती उत्सव व नवरात्रीत दांडिया खेळून त्याचे वाटोळे केले. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

उत्तर प्रदेशच्या कानपुरातून सुरुवात…

उल्लेखनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेशाच्या कानपुरात सर्वप्रथम आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. मुस्लिम समुदायाचे नागरीक या प्रकरणी ठिकठिकाणी मोर्चे काढून मशिदींवर हे पोस्टर लावत आहेत. काही ठिकाणी या प्रकरणी पोलिसांवर दगडफेक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातही नागपूरच्या मोमिपुरा व दिघोरी भागातील मशिदींवर आय लव्ह मोहम्मदचेच पोस्टर्स लावण्यात आले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t  कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*

आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..

“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी  7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav  वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page