माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर गुरव यांचा आरोप
संगमेश्वर तालुक्यातील आमसभा चार वर्षाने होत असताना अनेक तक्रारी असूनही या आमसभेत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे तक्रारदार अर्जदार नागरिक ज्या ईर्षेने आले होते त्याची निराशा झाली, यामुळे लोकांचे हाल झाले. नियोजनाचा अभाव असल्याने अर्जदारांना व्यवस्थित प्रश्न मांडताना घाई घाईने घेण्यात आले असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्री मनोहर गुरव यांनी केला आहे.
श्री मनोहर गुरव म्हणाले कीं जर अर्ज घेण्यात आले होते तर त्यांची पुकरणी करून किंवा टोकन देणे आवश्यक होते असे अर्जदारांच्या म्हणणे होते. परंतु सदर सभा ही सरकारसाठी महत्त्वाची झाली.
“वाळू उत्खनन मध्ये महसूल विभागाला प्रश्न विचारत असताना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. तसेच वाळू उत्खनन, वाहतूक तसेच जल जीवन मिशन योजनें तर्गत झालेल्या कामांच्या तक्रारी न घेता त्या घाईघाईने गुंडाळण्यात येऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या उपस्थितीत घेण्याबाबत निर्णय घेऊन महत्त्वाचे विषय टाळण्यात आले. जनतेला अर्जदारांना दिलासा मिळालेला नाही.
अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठ भरून गेले होते, आमसभा राष्ट्रवादीची होती की अर्जदारांची नागरिक संभ्रमात पडले” असेही गुरव म्हणाले.
लोकांचे प्रश्न महत्त्वाचे नसून सत्कार समारंभ महत्त्वाचे होते हे आम सभेच्या आयोजनावरून समजले असा आरोप मनोहर गुरव यांनी केला आहे.
नगरपंचायत देवरूख चे विकास कामात झालेला भ्रष्टाचार, कामांची निकृष्टता,जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामांची पहाणी,सी सी टिव्ही यंत्रणा,ग्रामपंचायत बंद असल्या बाबत, आंगवली येथील पाखाडी बाबत, काही ग्रामसेवक यांच्या तक्रारी, असे अनेक प्रश्न आमसभेत केले अभावी मांडले गेले नाहीत. एकच ठिकाणी राहिलेले अधिकारी कर्मचारी, कळंबुशी येथील गणेश विसर्जन घाट बाबत,मजूर संस्थाचा भ्रष्टाचार, आमसभा आयोजन करताना अर्जदारांना प्राधान्य देणे आवश्यक असताना वेळकाढू धोरण अवलंबिले गेले. परंतु जनतेचे प्रश्न मुख्य नसून पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमसभा आयोजित करण्यात आली असल्याचे मनोहर गुरव यांनी म्हटले आहे.
माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, संगमेश्वर तालुका अध्यक्ष शेखर जोगळे यांनी सांगितले कीं, आमसभा, पालकमंत्र्यांची जनता दरबार असे अनेक होतील पण ठोस निर्णय होत नसल्याची खंत आहे.