महाराष्ट्रातील प्रसिद्ध ” संगमेश्‍वर  शिंपणे ” भक्तगणलाल रंगांमध्ये रंगले, संगमेश्वर नगरी मध्ये लाल रंगाची उधळण, भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये शिंपणे उत्सव उत्साहात साजरा…

Spread the love

भाकरीच्या प्रसादाचे वैशिष्ट्य प्रसादासाठी भाविकांची गर्दी….


*संगमेश्वर /प्रतिनिधी /दि २८ मार्च-*  कसबा संगमेश्‍वर येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी 28 डिसेंबर रोजी  अपूर्व उत्साहात, लाल रंगाची मनसोक्त उधळण करीत व मटण भाकरीच्या प्रसादाचे आस्वाद घेत झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली.

दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा-संगमेश्‍वर येथील सर्व रस्ते लाल लाल होऊन गेले होते. उत्सवासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत.


             
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कसबा येथील शिंपणे उत्सवाची सुरवात व शेवट ढोल ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्याने झाली. उत्सवात दुपारी ३ च्या दरम्याने ट्रॅक्टरवर लाल रंगाच्या पाण्याची  रंगाची पिंपे भरून ठेवण्यात आली. या पिंपांमधील लाल रंग फेऱ्‍यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला. फेऱ्‍याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधूनही भक्तगणांच्या अंगावर लाल रंगाची उधळण करण्यात आली.

सकाळी ६ वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. ढोल ताशांच्या गजरात झांज पथक व डिजे वरील गाण्यांची धुम अशा संगीताच्या साथीवर हजारो पाय थिरकायला लागले. जवळपास पाच ते सहा  तास हा उत्साह असाच सुरू होता. प्रत्येक घरात काजुगर घातलेले मटण, वडे व भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही समावेश मोठा सहभाग होता. एकमेकांना रंगवण्यामध्ये जावायाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते.

कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्‍वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मुळ जाखमाता मंदिरातही भक्तगांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्‍यांचा समावेश होता. दिवसभर दिल्या जाणाऱ्‍या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रितीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले.

रात्री १० च्या दरम्यान कसबा व संगमेश्‍वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page