
रत्नागिरी- रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या, अप्रिय घटना व अंतर्गत सुरक्षिततेच्या रत्नागिरी शहर व सभोवतालच्या परिसरातील सदोष सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी रत्नागिरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
रत्नागिरी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करत आहे ,की वाढते शहरीकरण, देशाच्या इतर भागांतून रेल्वे मार्फत होणारी ये- जा तसेच एकूणच शहरात होणारे स्थलांतर पाहता अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी नगर परिषद आणि सभोवतालच्या परिसरातीतील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गृहनिर्माण संस्था, खाजगी आस्थापने यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात यावे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून रत्नागिरी शहरात कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणा सदोष तसेच नादुरुस्त असून ती सक्षम ठेकेदाराकडून पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आली.
दरम्यान,या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण यावर लवकरात कारवाई करू असे आश्वासन श्री. बगाटे यांनी उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर , तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे , सौरभ पाटील, उप शहर अध्यक्ष राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, मुन्ना शेलार, आकाश फुटक आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.