ठाण्यात विकासकाने ग्राहकांकडून पैसे घेऊन ग्रहप्रकल्पाची उभारणी केलीच नाही, शेकडो ग्राहक दहा वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत

Spread the love

आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्राहकांचे आंदोलन

ठाणे : येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणाऱ्या बांधकाम प्रकल्पासाठी विकासकाने दहा वर्षांपूर्वी ग्राहकाकडून सुमारे ३०० कोटी रुपये घेऊन त्यांना अद्याप घरे दिली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या नेतूत्वाखाली आंदोलन केले आणि यानंतर ऑगस्टपासून बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. ग्राहकांना हक्काची घरे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा केळकर यांनी विकासकाला दिला आहे. 

राजेश पटेल असे विकासकाचे नाव आहे. या विकासकाने २०१३ साली घोडबंदर मार्गावर तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात राज टॉवर हा गृहप्रकल्प उभारणीची घोषणा केली होती. या प्रकल्पातील सदनिकांची विक्री करत त्याने ग्राहकांकडून पैसे घेतले होते. अनेकांनी निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तर काहींनी कर्ज काढुन आयुष्यभराची पुंजी घरासाठी गुंतवली. घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल या आशेने सुमारे ५०० जणांनी साधारण २५० ते ३०० कोटींची रक्कम विकासकाला दिली. परंतु गेल्या दहा वर्षात या विकासकाने इमारतीची एक विटही रचली नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

या नागरिकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आमदार केळकर यांनी जाब विचारताच विकासकाने १५ मे २०२१ रोजी काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता विकासकाने केली नाही. यामुळे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांनी शनिवारी रस्त्यावर उतरून विकासकाविरोधात आंदोलन केले. यानंतर येत्या ४ ऑगस्टपासून बांधकामास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. दरम्यान विकासकाची गय केली जाणार नसून जोपर्यंत ग्राहकांना हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार केळकर यांनी यावेळी दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page