
संगमेश्वर अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर परिसरात दहा दिवसाच्या अनंत चतुर्दशीच्या गणपतीचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
सायंकाळी चार वाजता गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. काहींनी डोक्यावरून तर काहींनी हातगाडी व चारचाकी वाहनातून ढोल ताशे फटाक्यांची आताच भाजी करत वाजत गाजत गणरायांची मिरवणूक काढली.
महिलांनी फेर धरून गणेश गायनाच्या तालावर नृत्य केले. अभंग गायन केले व ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. ढोल वादक मुलांनी यावेळी मनोरे केले. पाच वाजता विसर्जनाला सुरुवात झाली. सायंकाळी एकापाठोपाठ एक गणरायाचे विसर्जन होत असताना विविध ठिकाणाची ढोल पथके एकत्र नाक्यामध्ये आल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संगम तेथे पाहाव्यास मिळाला.
अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये तीन ढोल पथकांनी आपली वेगवेगळी ढोल पथकाचे सादरीकरण केले.लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुली, महिला, मुलगे अशा एकत्रित ढोल पथकाच्या नादामध्ये गणरायांचे विसर्जन हसतमुख पहावयास मिळाले.गद्रे वखारी समोरील शास्त्री नदी घाट, हनुमान मंदिर घाट, माभळे येथील हायवे जवळील घाट व कोंड असुर्डे, शास्त्री नदीच्या तीरावर गणरायांचे भाविकांनी साश्रू नयनानी विसर्जन केले.
होमगार्ड व पोलीस यांनी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त ठेवला.पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, सुभाष गुरव बंदोबस्ताच्या सेवेत होते.कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. यामुळे पोलिसांच्या सेवेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर