
तालुका अध्यक्ष रुपेश कदम
◾️देवरुख/ जनशक्तीचा दबाव /8 नोव्हेंबर-
▪️माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान करणारे ग्रामस्थ बंधू-भगिनी या सर्वांना हा विजय समर्पित करते असे तळेकांटे ग्रा. पंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार सुषमा बने यानी सांगितले.
▪️या विजयावर प्रतिक्रिया देताना तालुका प्रमुख रुपेश कदम यांनी सांगितले की, संगमेश्वर तालुक्यात भाजपाचा झंझावात सुरु झाला आहे. तळेकांटे येथील विजयाने सुरुवात केली आहे. ग्रापपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद विधानसभा, लोकसभा या प्रांतात आता भाजपाचाच दबदबा राहणार आहे. गावागावात पक्षप्रवेश होत आहेत व भाजपाची ताकद वाढत आहे”
▪️”आमचे नेते श्री.रवींद्र चव्हाण, श्री.निलेश राणे, जिल्हा अध्यक्ष श्री.राजेश सावंत, श्री.प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत”.