
*रत्नागिरी:* सन २०२५ ते २०३० कालावधी करता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील ९४ पैकी ४६ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहामध्ये ही आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता काढण्यात आली. त्यामध्ये एकूण ९४ ग्रामपंचायतींपैकी ४६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती स्त्री हे आरक्षण कशेळी आणि वाटद या ग्रामपंचायतीला मिळाले आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री हे आरक्षण गावडे आंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडी खुर्द, साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड, खालगाव आणि दांडे आडोम या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी लागू झाले आहे. तर काळबादेवी, देऊड, चांदेराई, तरवळ, शिवार आंबेरे, विल्ये, नाचणे नाणीज, बोंडे, टेंभे, टिके, सतकोंडी, वळके वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगाव, लाजुळ, सैतावडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, पिरंदवणे, जांभरुण, जांभरी, चवे आणि चाफेरी या ३२ ग्रामपंचायतींसाठीच्या सरपंच पदी सर्व साधारण गटातील स्त्री सरपंच म्हणून कार्यरत होणार आहे.

याशिवाय धामणसे, हरचेरी आणि कुरतडे या ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग हे आरक्षण मेर्वी, कळझोन्डी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाटये, चरवेली, नाखरे, आगर नरळ, मावळंगे, शिरगाव आणि पानवल ग्रामपंचायतीला लागू झाला आहे. तर सर्वसाधारण गटामध्ये सड्या मिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, नेरूळ, बसणी, साठर, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर, केळे, गणेश गुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली झरेवाडी, रानपाट, भगवती नगर, ओरी, भोके, गोळप, नांदिवडे, पोमेंडी बुद्रुक आणि कर्ला ग्रामपंचायतचा समावेश आहे.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
