रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने सांगितले भाजपच्या विजयाचे गणित…

Spread the love

रत्नागिरी : एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार व अन्य उमेदवार व नोटाला काही मते मिळाली. विधानसभेची स्थिती पाहता भाजपची हमखास ६० हजारांहून अधिक मते आहेत. काही आपले मतदार येऊ शकले नव्हते अशी १० हजार मते, तळ्यात-मळ्यात असणारी अशी २० हजार मते आहेत. त्यामुळे भाजपची मते १ लाखापर्यंत नेणे शक्य आहे. दुसरा कोणताच पक्ष लाखाच्या घरात जाणार नाही, असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी करून भाजपच्या विजयाचा गणित सांगितले.

युती, आघाडीतले ६ पक्ष आहेत व अन्य पक्ष आहेत. साधारण दोन लाख मतदान होईल. त्यातील लाखभर मते मिळवली की जय भाजपचाच आहे, असे त्यांनी विश्वासपूर्वक सांगितले.

स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित संमेलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. बाळ माने म्हणाले की, आपण घरात जसा लहान बाळाचा जसा पांगुळगाडा काढतो, तसा युतीचा पांगुळगाडा काढला पाहिजे तरच पक्ष वाढेल. बूथप्रमुख, पन्नाप्रमुख पूर्ण तयारी करूया. ३५० बूथमध्ये किमान ४० पदाधिकारी जोडूया. नकारात्मक विचार सोडून द्या. माने गरीब आहेत, मग कसे होणार असा विचार करू नका. आपल्याकडे एनटीआर बॅंक, आरसी बॅंक व कार्यकर्त्यांची मोठी बॅंक आहे. दोन वर्षे वनवास सहन करतोय, तेव्हा कोण येत नाही विचारायला. आपण युतीत फरफटत जायचे, मांडलिक व्हायचे याबाबत ठरवले पाहिजे, भाजपच्या अस्तित्वाची व रत्नागिरीच्या भवितव्याची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याची हीच योग्य वेळ आहे.

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि रत्नागिरीत सुरेंद्र

दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, गुहागरमध्ये भाजपचे आमदार असतानाही सेनेला उमेदवारी दिली. त्याप्रमाणेच रत्नागिरीमध्येही असे करता येईल. त्याकरिता ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोलले पाहिजे. हा प्रयोग रत्नागिरीत करायला काय अडचण आहे, असे विचारा. दुसऱ्या इच्छुकांना विधानपरिषद द्या, राज्य सभा द्या, आमचे काही म्हणणे नाही. भाजपला हक्काचा आमदार मिळाला पाहिजे, ही मागणी आहे. आमचे प्रश्न मांडायला आमचा माणूसच हवा.

या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतेज नलावडे, अनंत मराठे, दादा दळी, राजन फाळके, ॲड. विलास पाटणे, सतीश शेवडे, ॲड. धनंजय भावे, ऐश्वर्या जठार, विनोद म्हस्के, प्रशांत डिंगणकर आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page