
*राजापूर :* मुंबई – गोवा महामार्गांवर राजापूर, हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोराची धडक झाली. या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शेखर नायडू (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत.अपघातग्रस्त कार (एम एच ०२, इ झेड ४७४८ ) मुंबई, मालाड कडून कणकवली, भिरकोंडकडे चालली होती. कारमधून सहाजण प्रवास करीत होते. कणकवली येथे नातेवाईकांकडे ते चालले होते. वाटेत त्यांनी चहा, नाष्टा केल्यावर ते पुढे चालले असता राजापूर, हातीवले येथील टोल नाक्यावर ट्रकला (एम एच १० ,ए डब्लू ८१४४ ) कारने मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये कारमधील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर राजापूर मधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून कणकवलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*