पुणे : पुण्यातीलसावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे . विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग झाले . ज्या खुर्चीवर कुलगुरू बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलावर दारूची बाटली आणि शस्त्र ठेवून रॅपर शुभम जाधवने रॅप साँग म्हटले . हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली . शुभम जाधवविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला , मात्र अद्याप कारवाई केलेली नाही . दरम्यान , रॅप साँगसाठी विद्यापीठातील ज्या कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे . विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे .रॅप साँगमध्ये अश्लील भाषेचा वापर केला आहे. धक्कादायक म्हणजे रॅपर शुभम जाधवला विद्यापीठातील अधिसभा भरते तेथे जाण्यास परवानगी कोणी दिली? दारूची बाटली, शस्त्र घेऊन रॅपर जाधव तेथे गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावेळी विद्यापीठातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱयांनी त्याला का अडवले नाही? आदी गंभीर प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
रॅप सॉंगचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे