
प्रतिनिधी – विनोद चव्हाण– दिनांक २२ जुलै २०२५ रोजी कळसवली (ता. राजापूर) येथे “माझी वसुंधरा अभियान 6.0” अंतर्गत वृक्षलागवड आणि मियावाकी वन निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमात राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. टी. बी. जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री. निलेश जगताप, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. बडद, विस्तार अधिकारी (कृषी) श्री. आपटे व श्री. सावंत, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक श्रीमती बार्सिंग, ग्रामपंचायत अधिकारी श्री. हिवाळे, सरपंच श्री. देवेश तळेकर, सर्व सदस्यगण, स्थानिक शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, ग्रामस्थ, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे मियावाकी पद्धतीने वननिर्मितीचा प्रारंभ, ज्यात स्थानिक प्रजातींच्या झाडांची घनदाट लागवड करून जैवविविधतेला चालना देण्यात आली. ही पद्धत कमी जागेत जास्त प्रमाणात हिरवळ निर्माण करण्यासाठी उपयुक्त असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी मानली जाते.

कार्यक्रमावेळी गटविकास अधिकारी मा. जाधव साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनच्या SBMSSG2025 मोबाईल ॲपचा डेमो दाखवून, या अॅपचा उपयोग व लाभ ग्रामस्थांना समजावण्यात आला आणि उपस्थितांकडून अभिप्रायही नोंदवण्यात आला.
मुख्य फायदे–
• परंपरागत दुहेरीकरणाच्या तुलनेत 10 पट जलद वाढ.
• विविध प्रजाती एकत्र असल्याने बायो डायव्हर्सिटीमध्ये लक्षणीय वृद्धी
• प्रदूषण नियंत्रण, कार्बन शोषण, ध्वनी व धुळीपासून संरक्षण – प्रमुख लाभ
• कमी जागेत ही तगडी हिरवळ निर्माण होते. ग्रामिण आणि शहरी संवर्धनात उपयोगी
हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि सर्वांच्या सहभागाने यशस्वी झाला. परिसरात हरित पट्टा वाढवण्याच्या दृष्टीने या वृक्षलागवडीचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर