कर्जत : प्रतिनिधी (सुमित क्षिरसागर) जागतिक महिला दिनानिमित्त ऍड रंजना धुळे यांच्याकडून महिला शक्तीचा सन्मान करण्यात आला
.
वाकस ग्रुप ग्रामपंचायत मार्यदित घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे मानकरी अपर्णा विनोद कालण,तर खेळात सहभागी झालेल्या स्पर्धकांना देखील बक्षीस वाटण्यात आली सदर कार्यक्रमा दरम्यान या महिला जिल्ह्या अध्यक्षा उमा मुंडे ह्या उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष ऍड रंजना धुले यांनी वाकस ग्रुप ग्रामपंचायत मार्यदित महिलांसाठी हळदीकुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत मधील सर्व आजी माजी महिला सरपंच, उपसरपंच, सदस्या शिक्षिका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर, सी.आर.पी. तसेच परिचारिका तर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान पत्रक देवून मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणात महिला वर्गानी उपस्थिती दर्शवली होती.तर येणाऱ्या प्रत्येक महिलांना साडी चोळी देवुन त्यांचा ही यथोचित सन्मान यावेळी ऍड रंजना धुळे व त्यांच्या सहकारी महिला मंडळींनी केला. कार्यक्रमात पहिल्यांदाच महिलांसाठी खेळाचे देखील मोठे आयोजन केले होते. खेळ पैठणीचा खेळा सोबत विविध खेळ घेण्यात आले असून महिलांचा याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. दरम्यान खेळ पैठणीचा
कार्यक्रमाचे प्रथम मानकरी अपर्णा विनोद कालण. यांना पैठणी व वॉशिंगमशीन देवून सत्कार करण्यात आला तर दृतीय पारितोषिक क्रमांक जयश्री गणेश दळवी यांना कुलर, तृतीय पारितोषिक बक्षीस दर्शना अरुण डायरे यांना मिक्सर भेट यावेळी ३५ हुन अधिक विजयी महिलांना विविध प्रकारची पारितोषिक बक्षिसे देण्यात आली.
प्रथमच दुर्गम भागात असा भव्य दिव्य कार्यक्रम धूळे यांनी महिलांसाठी राबवल्याने महिलांनी धुळे यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादीच्या जिल्ह्या महिला अध्यक्षा उमा मुंडे यांनी ग्रहण केले तसेच व्यासपीठावर कर्जत शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुष्पा दगडे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा हिरा दुबे, रा.जि. प.माजी सदस्या रेखा दिसले, पंचायत सदस्या सुरेखा हरपुडे, जिल्हा सरचिटणीस ऍड पूजा सुर्वे, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, नगरसेविका सुवर्णा निधे भारती पालकर, मधुरा चंदन, वर्षा पाटील, सरपंच प्रभावती लोभी, वृषाली क्षीरसागर, माजी सरपंच वंदना थोरवे, दीपिका जंगले, माजी उपसरपंच मनीषा पाटील,यांसह मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी,व विविध राजकीय पुढारी,महिला वर्ग उपस्थित होते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा