
कर्जत : प्रतिनिधी (सुमित क्षिरसागर)
कर्जत तालुक्यात नुकताच न भूतो न भविष्यती अशी बैलगाडा शर्यत मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडली. या बैलगाडा शर्यतीला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी राजकीय फटकेबाजी करत सुधाकर घारे यांनी राजकीय मैदान जिंकले असल्याचे सुतोवाच केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खांडपे येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला राज्यभरातून बैलगाडा मालकासह, बैलगाडा शौकिनांनी मोठ्या प्रमाणत हजेरी लावत गर्दी केली होती. मात्र या वेळी खेळाचे मैदान गाजवले ते मथुर आणि बकासुर या बैलांनी. तर दुसरीकडे इतल्या मोठ्या स्तरावर आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या आयोजनातून सुधाकर घारे यांनी राजकीय मैदान गाजवले असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये गाजत आहे.

नाद एकच बैलगाडा शर्यत असे म्हणत कर्जत तालुक्यात इतिहासात प्रथमच भव्य बैलगाडा शर्यत अशा अशयाच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे नेते तथा रायगड जिल्ह्या परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आपल्या खांडपे या गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.दरम्यान येथे बैलगाडा शर्यत खेळवण्यासाठी घारे यांनी उत्तम असे नियोजन केले होते, तर नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने देखील घारे यांनी पुढचा विचार करून उपाययोजना केलेली यावेळी दिसून आली. विनाशुल्क प्रवेश या बैलगाडा मालकांना येथे देण्यात आला होता तर शर्यतीला येणाऱ्या सर्व प्रेक्षक नगरिकांना उत्तम जेवणाची सोय देखील केली गेली होती. सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत या मैदानावर राज्यभरातून बैलगाडा मालक येतच असल्याने शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षकांची वाढत चाललेली गर्दी यामुळे कर्जत शहरातील चारही दिशेकडील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत होती परंतु कर्जत पोलिस ही रस्त्यावर उतरले असल्याने शहरातील ही वाहतूक कोंडी लगेचच सुटत होती.

खरं तर सुधाकर घारे यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून नादच केला होता.हजारो लाखो नागरिकांच्या उपस्थितीने मैदान भरून गेले तर हे खेळाचे मैदान खरे गाजले ते मथुर कल्याण आडवली येथील बैल जोडीने तर बकासुर ह्या पुणा सातारा येथील बैलजोडीच्या मालकाने. शेवटच्या क्षणापर्यंत येथे मैदानावर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत होती.तर मैदानावरील गर्दी तर शहरात झालेल्या रस्तावरील गर्दी पाहून कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेले खासदार सुनील तटकरे यांनी देखील घारेंचे ग्रेट शो -मॅन म्हणून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली.एकूणच खेळाचे मैदान जरी बैलगाडा चालकांनी गाजवला जरी असला तरी सुधाकर घारे यांनी राजकीय मैदान यानिमित्ताने गाजवले हे खरं. एकूणच या कार्यक्रमाला माजीं पालकमंत्री आमदार अदिती तटकरे,खासदार सुनील तटकरे,आमदार सुनील अण्णा शेळके,माजी जिल्ह्या परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे,तालुका अध्यक्ष भगवान चंचे,युवा नेते अंकित साखरे,विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळीं उपस्थित होते

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा