सिंधुदुर्ग : शनिवारी रात्रीपासून मुंबईसह कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. 29 जूनपर्यंत मान्सून राज्य व्यापणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे., पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. कोकणात जाणारे चाकरमानी या महामार्ग सुरू होण्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता समोर आलेल्या एका व्हिडिओमुळं संताप व्यक्त होत आहे. पहिल्याच पावसाने मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली असल्याची तक्रार व्यक्त करण्यात येत आहे.
कणकवलीत चक्क महामार्गामुळे सर्व्हिस रोडवर धबधबे वाहताना दिसून आले आहेत. कणकवली येथे महामार्गावर मोठा पूल बांधण्यात आला आहे. आता या ब्रिजच्या कामाबद्दल वारंवार शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यातच पहिल्या पावसाने या ब्रिजवरून अनेक धबधबे वाहताना दिसून आले आहेत.
पुलावरुन दुधडी भरुन पाणी खाली पडताना दिसत आहे. ब्रिजवरुन पडणाऱ्या या पाण्यामुळे सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या वाहनांना व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जाहिरात