गणेशोत्सवामध्ये संगमेश्वरच्या कु. साहिल सुनिल आंबवकर याने कोकण रेल्वेचा देखावा साकारला…

Spread the love

संगमेश्वर – दिनेश आंब्रे.- कोकणात गणेशोत्सवाचे पर्व अतिशय जल्लोषात व उत्साहात सुरू झाले आहे. यामुळे गणेशभक्त युवक व लहान मुले गणेशासमोर वेगवेगळे देखावे उपक्रमात आहेत. सध्या या गणेशोत्सवानिमित संगमेश्वर ( नावडी ) येथील युवा उपक्रमशील गणेशभक्त साहिल सुनिल आंबवकर याने यंदाच्या चौथ्या वर्षी कोकण रेल्वेचा देखावा साकारून संगमेश्वरमधील नाविन्यपूर्ण सुशोभिकरण केलेल्या रेल्वेस्टेशनचे तसेच बससेवा, उक्षीचा धबधबा, उक्षी बोगदा व सह्यादीचा निसर्गरम्य परिसर इत्यादी दृश्ये एक महिना मेहनत करून कुटुंबियांच्या सहकार्याने केले आहे.


                  

यामध्ये साहिलचे मित्र सुशांत भोसले, अकील जाधव व धनश्री अश्या मित्रपरिवाचे सहकार्य लाभले. सध्या देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
                  
स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण असा संदेश साहिलने या देखाव्यातून दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर सप्तेश्वर मारलेश्वर व इतर पर्यटन स्थळांची माहिती या या देखाव्यातून त्यांनी दिली आहे. संगमेश्वर मधील पर्यटनाचा विकास झाला तर रोजगार निर्मिती होईल व संगमेश्वर चे नाव जागतिक पटलावर पोहोचेल असा विश्वास द्यावे यावेळी व्यक्त केला. पंचक्रोशीतून सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून येत आहे सर्व नागरिक

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page