
चिपळूण : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळूण तालुक्यात भाजपाची मोर्चेबांधणी वेगाने सुरू झाली आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कामथे येथील भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीस माजी आमदार डॉ. विनय नातू आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत प्रदेश कार्यालयाकडून आलेले उमेदवारी अर्ज इच्छुकांनी दोन दिवसांतच संबंधित मंडल अध्यक्षांकडे भरून द्यावेत, अशी सूचना करण्यात आली. तसेच प्रत्येक जि.प. गटातील स्वतंत्र बैठकांचे नियोजन, उमेदवारांची तात्काळ घोषणा, आणि सुसूत्र प्रचार रणनीतीची आखणी या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांदरम्यान आलेल्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शनही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, चिपळूण ग्रामीण अध्यक्ष विनोद भुरण, पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*