
नवी मुंबई: दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी जन आक्रोश समितीच्या वतीने CA निलेश घाग सर, श्री प्रकाश पालांडे सर, श्री सुरेंद्र पवार सर(शाहीर) आणि श्री राजेश आयरे यांनी कोकण भवन मधील हायवे संबंधित अधिकारी यांची चिपळूण ब्रीज दुर्घटना संबधित भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व अधिकारी चिपळूण येथे घटनास्थळीं असल्याचे सांगण्यात आले.
त्याच बरोबर जन आक्रोश समितीच्या चिपळूण येथील कार्यकर्त्यांनी घटना स्थळी वरिष्ठांना भेटण्याचा प्रयत्न केला असता चिपळूण पोलीस स्टेशन येथील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिंदे साहेब यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत चर्चा करून त्यांना या विषयी कारवाई करण्याची मागणी करून निवेदन दिले. त्यावेळी जन आक्रोश समितीचे पदाधिकारी कोषाध्यक्ष Adv श्री संदिप विचारे, श्री पराग लाड सर आणि Adv स्मिता कदम हजर होत्या.
निवेदनात मुंबई गोवा महामार्गावरील पुलाच्या दुर्घटनेला जबाबदार अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होणेबाबत. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती वतीने पत्र दिले. शिंदे साहेबांनी संबंधित दोषींवर कठोर अंमलबजावणी करू, संघटनेला सहकार्य करू,
फिर्यादी दाखल करू असे कबूल केले.