चिपळूमध्ये रिक्षाचालकांची मनमानी;प्रवाशाकडून जादा भाडे घेतल्याप्रकरणी रिक्षा व्यावसायिकाची अनुज्ञप्ती निलंबित

Spread the love

चिपळूमध्ये रिक्षचालकांची मनमानी;प्रवाशाकडून जादा भाडे घेतल्याप्रकरणी रिक्षा व्यावसायिकाची अनुज्ञप्ती निलंबित

चिपळूण :- प्रवाशाकडून जादा रिक्षा भाडे आकारल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने चिपळुणातील एका रिक्षा व्यावसायिकाकडून पाचशे रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करत दहा दिवसांसाठी अनुज्ञप्ती निलंबित केले आहे . यामुळे तक्रारदार विद्याधर साळुंखे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे .

चिपळूण सावर्डेमध्ये रिक्षचालकांचा मनमानी कारभार अव्वाच्या-सवां भाडे; प्रवाशी हैराण


माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी १४ नोव्हेंबर रोजी संबंधित रिक्षा व्यावसायिकाविरोधात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती . चिपळूण स्थानक ते पाग जोशी आळी येथे जाण्यासाठी त्या रिक्षा व्यावसायिकाने ७० रुपयांचे जादा भाडे आकारल्याने त्याच्यावर कारवाई करावी , अशी मागणी केली होती . त्यानंतर रिक्षा व्यावसायिकाला आठवडाभरात आपले म्हणणे वाहनाच्या मूळ प्रमाणपत्रासह सादर करण्याच्या सूचना वजा नोटीस बजावली होती . आरटीओ कार्यालयाकडून संबंधित रिक्षा व्यावसायिकावर तक्रारीच्या अनुषंगाने ५०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले . तसेच त्याची अनुज्ञप्ती १० दिवसांकरिता निलंबित केले आहे .

त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई त्रेवार्षिक समायात्रा २०२४- महोत्सव लवकरच…
दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४
स्थळ – मंदीर परिसर , दहिवली बु. ता. चिपळूण, जि. रत्नागिरी अवश्य भेट द्या! आणि आईचा आशिर्वाद घेऊया

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page