कुत्रा चावल्यास सरकार देणार भरपाई, प्रत्येक दाताच्या खुणेमागे मिळणार ‘इतके’ रुपये…..

Spread the love

कोणत्याही व्यक्तीवर जर भटक्या कुत्र्याकडून हल्ला करण्यात आला तर आता सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई कुत्र्याच्या दाताप्रमाणे द्यावी लागणार आहे. कारण एक दात लागला असेल तर 10 हजार रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने (High Court of Haryana and Punjab) हा आदेश दिला आहे. एका सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, जर 0.2 सेमी मांस बाहेर आले असेल तर किमान 20, हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत 193 प्रकरणांवर सुनावणी करताना न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे.

संबंधित समित्यांनी कारवाई….

भटके, वन्य प्राणी अचानक वाहनासमोर आल्याने जखमी किंवा मृत्यू अशा घटना आणि अपघात घडतात. त्यासाठी पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले की, कुत्रा चावल्यानंतर जर कोणी आवश्यक कागदपत्रांसह भरपाईसाठी अर्ज दाखल केला गेला, तर संबंधित समित्यांनी त्यावर कारवाई करावी असंही त्यांनी सांगितले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आणि 4 महिन्यांत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेशही त्यांन यावेळी दिले आहेत.

चिंताजनक बाब….

या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती भारद्वाज यांनी सांगितले की, मृतांची वाढती संख्या आणि रस्त्यांवर भटक्या प्राण्यांचे प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर प्रचंड मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे आता राज्याने ही जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले

प्राथमिक जबाबदारी राज्याची..

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, ही नुकसान भरपाई देण्याची प्राथमिक जबाबदारी ही राज्याची असणार आहे. त्यामुळे राज्याकडून ही नुकसान भरपाई कुत्र्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती, एजन्सी किंवा विभागाकडून ती नुकसानभरपाई वसूल करू शकते असंही त्यांनी सांगितले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, कोणतीही घटना किंवा अपघाताबाबत तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. त्यासाठी राज्य सरकारनेही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

समिती गठित

भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यांबाबत नुकसान भरपाईसाठी गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये उपायुक्त, एसडीए, वाहतूक पोलीस किंवा पोलीस उपाधीक्षक यांसारख्या अधिकाऱ्यांचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ

पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये कुत्रा चावण्याचे प्रमाण प्रचंड आहे. गेल्या पाच वर्षांत 6,50,904 हून अधिक जणांना कुत्र्याकडून हल्ला करण्यात आला आहे. तर या 6,50,904 पैकी 1,65,119 जण गेल्या वर्षभरात जखमी झाले आहेत.

सीईओ पराग देसाईंचा बळी

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या या आदेशामुळे भटक्या कुत्र्यांबाबत नवा वाद सुरू होण्याची शक्यात आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत देशभरात चर्चा सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये वाघ बकरी या प्रसिद्ध चहा कंपनीचे सीईओ पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना ते पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page