ओझरे जि.प. गटातील आंगवली येथे युवा नेते रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे संपर्क से समर्थन अभियान संपन्न…

Spread the love

भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर १२, २०२३.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील आंगवली येथे आज भारतीय बौद्ध महासभा ग्रामसंघ आंगवली येथील बौद्ध विहारास सदिच्छा भेट दिली. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, रत्नागिरी द. जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव आदी मान्यवरांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले.

यानंतर युवा नेते श्री. रूपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली ‘संपर्क से समर्थन’ अभियान संपन्न झाले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा ग्रामसंघ आंगवली येथील ग्रामस्थांना देशगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली भारत सरकारने मागील ९ वर्षांत देशाचा केलेला विकास, गरीब कल्याणाच्या योजना, महिला व बालकल्याण तसेच दलितांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा, जी-२०, भरड धान्य विषयक जनजागृती करण्यात आली.

नागरिकांनी ९०९०९०२०२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन मोदी सरकारला समर्थन देण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. या आवाहनाला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थांना भेटी देण्यात आल्या. यानंतर उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसहित चहापानाचा आस्वाद घेतला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page