मुंबई- कोल्हापूरात हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं.यानंतर राज्यातलं राजकिय वातावरण चांगलंच तापलं. सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा कलगीतुरा देखील रंगला. मात्र,यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी चर्चा करताना सत्ताधाऱ्यांवर बोचरी टिका केली आहे.
जलील म्हणाले,’७५ वर्षात आम्हालाही माहित नव्हता औरंगजेब असा दिसतो,आता अचानक फोटो कुठून आले?,विनाकारण राज्यातील वातावरण खराब केलं जातं आहे. लोकांमध्ये हिंदू-मुस्लिम करून द्वेष पसरवला जात आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.
तसंच ते पुढे म्हणाले की, ‘कर्नाटक मध्ये भाजपचा पराभव झाला.मात्र महाराष्ट्रात पराभव होऊ नये यासाठी भाजप जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.हे कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये हिंदू-मुस्लिम समाजात मोठी दरी निर्माण होईल आणि याला सर्वस्वी भाजपा कारणीभूत असेल,असं देखील मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं.