
इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली.
पाकिस्तान 9 मे 2023- पाकिस्तानचा Pakistan पंतप्रधान आणि भ्रष्टाचार हे समीकरण बनले आहे. कारण पाकिस्तानच्या इतिहासात बेनझीर भुत्तो, युसूफ रझा गिलानी, नवाझ शरीफ, जनरल मुशरफ या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यातील काही जण अटकेच्या भीतीने देश सोडून कायमचे परदेशात स्थायिक झाले. या यादीमध्ये आणखी एकाची भर पडली. माजी पंतप्रधान इम्रान खान Pakistan यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचे Pakistan माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने मंगळवारी त्यांना अटक केली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसर्र्त चीमा यांनी ट्वीट करत अटक करणारे सुरक्षा अधिकारी यांनी इम्रान खान यांना टॉर्चर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इम्रान खान यांना मारहाण केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.