
दिनेश आंब्रे/ संगमेश्वर – पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे स्तरावर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती तसेच सर्व जाती धर्मातील धर्मगुरू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश करून सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
आज रोजी 11.30 ते 12:40 वा चे मुदतीत संगमेश्वर पोलीस ठाणे येथे सामाजिक सलोखा कमिटी सदस्यांची बैठक घेण्यात आलेली आहे.
सदर बैठकीमध्ये सामाजिक सलोखा समिती स्थापना करण्यामागचा उद्देश समजावून सांगून उपस्थिततांना खालील प्रमाणे मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सामाजिक सलोखा, शांतता रहावी याकरिता सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला असल्याचे सांगितले. या कमिटीच्या माध्यमातून पोलीस ठाणे स्तरावर महत्त्वाच्या सणाचे पार्श्वभूमीवर गावातील तसेच समाजातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता कमिटी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.


सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून या समितीच्या वतीने सर्व धर्मीय सण आनंदात साजरे होण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असलेबाबत नमूद केले.आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने गोवंशीय जनावरांची हत्या तसेच गोमांस वाहतूक इत्यादी वरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता स्थानिक पातळीवर बैठक घेऊन प्रयत्न करणे बाबत सांगितले.
गोवंशीय जनावरे तसेच इतर घटना याबाबत माहिती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे देण्यात यावी.कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेणार नाही याबाबत मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा कमिटीचे वतीने सलोखा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपले समाजाच्या वतीने अथवा ग्राम स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घेणे. तसेच अमली पदार्थ विक्री होणार नाही. तसेच कोण करत असल्यास त्याची माहिती देणे याबाबत अवाहन केले. सदर बैठकी करता पोलीस ठाणे हद्दितील विविध समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, पदाधिकारी असे 36 सदस्य उपस्थित होते.


संगमेश्वर पोलीस स्टेशन कडून गठित केलेली सामाजिक सलोखा समिती पुढील प्रमाणे आहे…
१.श्री. राजेंद्र विष्णु महाडीक, २ श्री. सुजित विष्णु महाडीक,३ श्री. शंकर रघुनाथ भुवड, ४ श्री. सहदेव बेटकर,५.श्री. संतोष थेराडे,६ श्री. सुभाष बाबाराम नलावडे,७ श्री. विकास सूर्वे,८ श्री. संतोष येडगे, ९.श्री. विजय कुवळेकर,१० श्री. संजय श्रीधर कदम,११ श्री. मनोज दत्ताराम शिंदे,१२ श्री. जितेंद्र माधवराव चव्हाण,१३ श्री. शेरेआलम हुसैन खोत,१४ श्री. विवेक प्रभाकर शेरे,१५ श्री. सिध्देश बिद,१६ श्री. अविनाश गुरव,१७ श्री. प्रमोद भार्गव शेटये,१८ श्री. गुलाम महमद अ. सत्तार पारेख,१९ श्री. राजेंद्र पोमेडकर,२० डॉ. श्री. अमित उल्हास ताटरे,२१ श्री विनोद मस्के,२२ श्री. जितेंद्र दत्तात्रेय पराडकर,२३ श्री. अनिल लक्ष्मण भिडे,२४ श्री. निलेश शांताराम कुंभार,२५ श्री. निबंध नरहर कानिटकर,२६ श्री. जमुरत अलीसाहेब अलजी,२७ श्री. तैमुर महामुद अलजी,२८ श्री विनोद पवार,२९ श्री सत्यवान विचारे,३० श्री. श्रीराम किसन शिंदे,३१ श्री सुरेश भायजे,३२ श्री शेखर उकार्डे,३३ श्री योगेश रेडीज,३४. श्री प्रदिप जाधव,३५ श्री सुशील भावजे,३६ श्री राजेंद्र सुर्वे,३७ श्री. कमरुद्दीन महामुद सावंत,३८ श्री गणपत चव्हाण,३९ श्री महेश देसाई,४० श्री राजेश मुकादम,४१ श्री आतिष पाटणे,४२ श्री ईलीयास मापारी,४३ श्री मजिद नेवरेकर,४४ श्री सुलतान हफसानी,४५ श्री सुरेश बबन कांगणे,
४६ श्री. गौतम गमरे,४७ श्री. राजेंद्र मोहीते, ४८ श्री. अमोल श्रीधर लोध. सदर प्रमाणे कमिटी घटित करण्यात आलेली आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी सदर कमिटी गठीत करण्यात आलेले असून समाजामधील सलोखा व शांतता राखण्यासाठी सदर कमिटी काम करणार आहे.
संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जातीय सलोखा समिती कमिटीला खालील प्रमाणे सूचना देण्यात आले.
▪️पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात सामाजिक शांतता राहावी याकरिता सर्वधर्मीय प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर यांचा या कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला असल्याचे सांगितले.
▪️ या कमिटीच्या माध्यमातून पोलीस ठाणे स्तरावर महत्त्वाच्या सणाचे पार्श्वभूमीवर मीटिंग घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकरिता प्रयत्न करण्यात येणार असून कमिटी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
▪️ सामाजिक सलोखा समिती सर्वसमावेशक असून या समितीच्या वतीने सर्व धर्मीय सण आनंदात साजरे होण्याकरिता प्रयत्न करण्यात येणार असलेबाबत नमूद केले.
▪️ आगामी बकरी ईद सणाचे अनुषंगाने गौवंश हत्या तसेच गोमांस वाहतूक इत्यादी वरून कोणताही अनुचे प्रकार घडणार नाही