दिवा: रेल्वे प्रवासी संघटना व मनसे आमदार श्री. राजूदादा पाटिल यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत अखेर केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेत आपल्या दिवा स्थानकाचा समावेश करण्यात आला. या योजनेअंतर्गत आता दिवा स्थानकासह अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असून रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात प्रवाशांकडून सूचना मागवल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरातर्फे दिव्यातील नागरिकांना विनंती आहे की आपल्याला दिव्यातून मुंबईच्या दिशेला कामावर जाताना मोठी कसरत व असंख्य अडचणींचा सामना करून कामावर जावे लागते त्यासाठीच दिव्यातील रेल्वे प्रवाशांनी आलेली संधी न सोडता कृपया प्रत्येकाने जास्तीत जास्त सूचना नोंदवाव्यात.
आपण या माध्यमातून आपल्या सूचना पाठवा!
ईमेल आयडी – drm@bb.railnet.gov.in किंवा cprooffice0@gmail.com
ट्विटर हॅन्डल – @drmmumbaicr
तुम्ही मेल किंवा ट्विट करत असल्यास सूचनेच्या सर्वात शेवटी #AmritBharat_Diva हे लिहावे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात