
रायगड : प्रतिनिधी (भास्कर पांचाळ) नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.नवी मुंबईच्या ऐरोली येथे एक भीषण अपघात झाला. कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये एक महिला गंंभीर जखमी झाली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली एन्ट्री पॉईं येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. कंटेनरवरील चालकांचा ताबा सुटल्याने कंटेनरने पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षामध्ये बसलेली एक प्रवासी महिला जखमी झाली आहे.
विडिओ पहा सविस्तर
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहनाना बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.