महत्वाची बातमी, पुन्हा मुंबईसाठीचा अलर्ट बदलला

Spread the love

दबाव विशेष प्रतिनिधी (कीर्ती केसरकर)

■ मुंबईसाठीचा अलर्ट बदलला

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुन्हा मुंबईसाठीचा अलर्ट बदलण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट वरुन पुन्हा रेड अलर्ट करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे अतिवृष्टीचा इशारा मानला जातो.  उद्या सकाळी 8.30 वाजतापर्यंत हा रेड अलर्ट असणार आहे.

■ ठाणेकरांना मुसळधार पावसाचा फटका, वंदना टॉकीजजवळ घुडघ्याच्या वर पाणी

ठाणेकरांना मुसळधार पावसाचा फटका, वंदना टॉकीजजवळ घुडघ्याच्या वर पाणी साचलं, पंप लावूनही पाण्याचा निचरा होईना, रिक्षा आणि दुचाक्या बंद पडतायत, सतत पाऊस सुरु असल्याने पाणी साचण्याचं प्रमाण वाढलं.

■ मुंबई – सायनच्या किंगसर्कलमध्ये पाणी साठलं, मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत सायनच्या किंग्जसर्कलमध्ये पाणी साठलं, दादर स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी, चर्चगेट स्टेशनवरील पावसाचा अखेर निचरा

■ पुण्यातील शिरूरमध्ये पाण्याचे अनोखे स्वागत

राज्यात एकीकडे पावसाने थैमान घातले असताना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. आता चास-कमान कालव्याला पाणी येताच शेतकऱ्यांनी पाण्याची पूजा करून वाजत गाजत पाण्याचे अनोख्या पध्दीतीने स्वागत केलं.

■ मुंबईतील चर्चगेट परिसर जलमय

चर्चगेट रेल्वे ट्रॅकवरील पाणी उपसल्याने चर्चगेट परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जवळपास गुढगाभर पाणी रस्त्यावर साचंले आहे. पालिका कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.

■ वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची हजेरी

वसई, विरार, नालासोपारामध्ये दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागच्या 24 तासात वसई तालुक्यात 64 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे. दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने पुन्हा एकदा ओसरलेले पाणी सकल भागात भरण्यास सुरवात झाली आहे.

■ मुंबईतील अनेक भागात पावसाचा जोर वाढला

हवामाल खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईत अनेक भागात पावसाचा जोर वाढायला सुरूवात झाली आहे. चर्चगेच, सायन, वांद्रे, कुर्ला, अंधेरी आणि बोरीवली या भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाकडून नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

■ सोलापूरमध्ये पावसाची संततधार सुरुच

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. सोलापुरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. स्मार्ट सिटी असलेल्या सोलापूर शहरात अनेक दिवसांपासून महापालिकेच्या अनास्थेमुळे खड्डेच खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे मागील तीन ते चार वर्षात 25 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page