⏩ मुंबईत आजपासून जी 20 परिषद
मुंबईत आजपासून ते 30 मार्चपर्यंत तीन दिवसांची जी-20 परिषद होणार आहे. या कालावधीत व्यापार आणि गुंतवणूक बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देशविदेशातील प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे वांद्रे, सांताक्रूझ, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, मिठी नदी येथील ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या आधी मागील डिसेंबर महिन्यात येथे जी-20 ची परिषद पार पडली होती.
⏩ NCERT चा अभ्यासक्रमात होणार मोठा बदल
NCERTच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होणार आहे. नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता NCERTच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे. हा नवीन बदल पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजे 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे.
⏩ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे. अशातच आता काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात लाल कांद्याला 800 ते 900 रुपये दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंत दर मिळत आहे.