
मुंबई : एसटी महामंडळाच्या सर्व बसमधून महिलांना अर्ध्या तिकिटावर राज्यात कोठेही प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून होईल.योजनेमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम राज्य सरकार महामंडळाला मिळेल. त्यातून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक अडचणीतील लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.
एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. आता राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी घेतला आहे.
सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात