ठाणे शहरात रस्ते सफाईला सुरूवात, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी; दिव्याचाही समावेश

Spread the love

ठाणे : ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मंगळवार सायंकाळपासून शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचे काम सुरू केले आहे.

ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मंगळवार सायंकाळपासून शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचे काम सुरू केले आहे.

ठाणे येथील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या ‘भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे’ भूमी-पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या.

नौपाडा-कोपरी, वागळे, सावरकर-लोकमान्यनगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवाडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रीया केलेल्या पाण्याने धुलाई करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. नियोजनाचे काम सुरू असले तरी पालिकेने मुख्य रस्त्यांची पाण्याने धुलाई सुरू केली आहे. 

कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रीया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात येत आहेत. टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. धुळ प्रदुषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. डांबरी रस्ते पाणी धुलाईने खराब होण्याची शक्यता असून यामुळे केवळ सिमेंट रस्तेच धुण्यात येत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page