
संगमेश्वर अर्चिता कोकाटे/ नावडी- माभळे संगमेश्वर ठाणे येथे प्रति वर्षाप्रमाणे स्थानापन्न केलेल्या गणरायांचे अकरा दिवसानंतर गद्रे वखारी समोरील शास्त्री नदीच्या घाटावर भावपूर्ण विसर्जन करण्यात आले गेले.
11 दिवस ज्ञानदेव हरिपाठ मंगळागौर शक्ती वाले तुरेवाले नाच भजन गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व मान्यवरांचे सत्कार इ. उपक्रम पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

मिरवणूक पोलीस ठाणे ते सोनवी पुलावरून मुख्य नावडी बाजारपेठ तसेच पागाळी मार्गे बॅन्जो पार्टीवर नाचत गाजत तसेच गणरायांवर पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिशबाजी करीत, महिला पोलिसांच्या पारंपारिक फुगड्या व नाच, तसेच होमगार्ड पोलीस पुरुषांनी देखील नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. लहान बालकांनी नाचण्याचा आनंद लुटला. लहान बालकांनी नाचण्याचा आनंद लुटला. पो. उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, हेड कॉन्स्टेबल किशोर जोशी, विनय मनवल यांनी ट्रॅफिकची सुव्यवस्था सुरळीत केली. कायदा व सुव्यवस्था राखून मिरवणूक सुरळीत पार पडली.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर9