
गौरव पोंक्षे/माखजन- महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या पुण्याच्या बालभारती ची जुनी इमारत मोडकळीला आली आहे.ह्या इमारतीचे तात्काळ नूतनीकरण करा अशी मागणी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधांनपरिषदेमध्ये केली. लक्षवेधी च्या माध्यमातून हा मुद्दा त्यांनी मांडला.
महाराष्ट्र राज्यामध्ये पाठपुस्तक निर्मितीसाठी व अभ्यासक्रम संशोधनासाठी बालभारती ह्या स्वायत्त संस्थेची स्थापना कै. वसंतराव नाईक यांच्या सरकार च्या काळात २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापना झाली.या संस्थेमध्ये पाठयपुस्तक निर्मिती,शैक्षणिक साहित्य निर्मिती व पुस्तक साठवणूक केली जाते.ई लर्निंग साहित्य,अनेक महत्वाची शैक्षणिक कागदपत्रे,संशोधनाच साहित्य जतन केले जाते.पण सध्या या बालभारती च्या इमारतिकडे पाहिलं तर ,इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे.इमारतीचे मागच्या बाजूचे कॉलम ढासळले आहेत
पाठयपुस्तक साठवणूक केली जाते त्या भागात स्लॅब मधून पाणी गळत आहे.किंबहुना ह्या साऱ्याचा जीविताला धोका होऊ शकतो.त्यामुळे या ४२ वर्षाहून जुनी असलेल्या इमारतीचे अद्ययावत स्वरूपात नूतनीकरण होणार का अशी लक्षवेधी मांडली
लक्षवेधी ला उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी ,आ ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडलेली वस्तुस्थिती खरी आहे.शासन त्या बाबतीत मंडळाशी बोलून ,नूतनीकरणा च्या बाबतीत निर्णय घेईल असे सांगितले.