सिंधुदुर्ग : गोवा महामार्गावर कुडाळ येथील साळगाव पुलानजीक सिंधुदुर्ग पोलिसांनी तब्बल ७ लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत एकुण 13 लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे
पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या साळगाव पुला जवळ सापळा रचून ही कारवाई केली. यात गुटख्यासह एका चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात बाबाजी नाईक (खासकीलवाडा, सावंतवाडी) यास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाट, हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरूनाथ कोयंडे, अमित पालकर यांनी ही कारवाई केली आहे.