कल्याण ‘ कल्याण पूर्वेत आय प्रभागातील व्दारलीपाडा भागात सुरू असलेली बेकायदा चाळींची बांधकामे या प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी पाडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केेली. मागील दोन दिवसांपासून आय प्रभाग हद्दीतील सरकारी, राखीव जमिनींवर सुरू असलेली बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती ‘आय’ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.
आय प्रभाग हद्दीत विविध भागात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी प्रभागात आल्याने साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी या सर्व बेकायदा बांधकामांची पाहणी करुन दोन दिवसांपासून बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, नव्याने उभ्या करण्यात येत असलेल्या बेकायदा इमारतींचे खांब तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. मोकळया जमिनीवरील दोन अनधिकृत गोदामेही या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली. उपायुक्त सुधाकर जगताप यांनी प्रभाग हद्दीत रस्ते अडवून उभ्या राहिलेल्या टपऱ्या, हद्दीतील बेकायदा चाळी, इमारती तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याआदेशाप्रमाणे ही कारवाई केली जात आहे.
“आय प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडणे, फेरीवाले हटविण्याची मोहीम नियमित सुरू आहे. आता एक मोहीम म्हणून ही कारवाई केली जात आहे. कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जात आहे, अशी माहिती कल्याण आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त हेम मुंबरकर यांनी दिली.
जाहिरात :