
खालच्या शब्दात कोणावर टीका करणे हे माझ्यावरचे संस्कार नाही, आजच्या मेळाव्याची गर्दी पाहून काही लोक रत्नागिरी सोडायच्या मार्गावर असतील
रत्नागिरीत शहर शिवसेनेचा मेळावा
रत्नागिरी : नितीन देसाई यांच्या स्टुडिओचे काय होणार हे सांगण्यापेक्षा आणि दुसऱ्यावर टीका करून बदनामी करण्यापेक्षा स्वतःची पत आणि पद सांभाळावे. नितीन देसाई जाण्यापूर्वी एक महिना मला भेटले होते. नितीन देसाई यांच्या सर्वात जवळचा माणूस मी आहे. त्यामुळे नितीन देसाई यांचे दुःख काय होतं याबाबत मला तोंड उघडायला लावू नका. जर ते मी बाहेर काढलं तर टीका करणाऱ्या लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पाहावे, असा घणाघाती हल्लाबोल राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. रत्नागिरी येथे सावरकर नाट्यगृहात आज सायंकाळी उशिरा आयोजित रत्नागिरी शहर शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, आज रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात जमलेल्या या गर्दीने विरोधकांच्या टीकेला उत्तर मिळालेले आहे. शहर कोणाच्या मागे आहे यावर शिक्कामोर्तब झालाय. आपल्या तोडीच्या माणसावर टीका करायची असते. काही लोक रत्नागिरी सोडण्याच्या मनस्थितीत असतील. एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. बोलणारे आदल्या दिवशी मला मुंबईत भेटतात आणि रत्नागिरीत येऊन छाती पुढे करून बोलतात. रत्नागिरी शहर फक्त आणि फक्त शिवसेनेचं आहे. ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. न बोलवता आज हजारो लोक आले. तर बोलावून आणले तर काही लोकांची पळता भुई थोडी होईल. सगळे शहरातील आहेतं. एकही बाहेरचा नाही. ही सगळी ताकद शिवसेनेची आहे. माझ्या विरोधात उमेदवार शोधण्यासाठी काही लोक मातोश्रीवर गेले होते. मात्र शोधून आले राजापूरचा उमेदवार. लोकशाही आहे. जनताच निर्णय घेणार आहेत. आम्हाला राजकारण कुणी शिकवू नये, असे मंत्री सामंत म्हणाले.
सामंत म्हणाले, मला अक्कल नाही असं कुणी समजू नये. पाचही मतदारसंघात भगवा फडकणार. बाकी सगळे घरी जाणारं. जिल्हा परिषद युतीची येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. ताकदीचे नगरसेवक आहेत त्यांना शिंदे साहेब नक्की तिकीट देणार. घाबरायची गरज नाही. सगळ्यात अगोदर लोकसभा निवडणूक आहे. तेव्हाच कळेल कुणाची ताकद आहे. मी होतो म्हणून तुम्हाला खासदारकी मिळाली, असे खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता सामंत म्हणाले.
आज रत्नागिरी शहर एक वर्षानंतर महाराष्ट्र मधील प्रत्येक माणूस शहर बघायला येणार आहे. शिवसृष्टी, तारांगण, ३ डी मल्टिमीडिया प्रोजेक्ट, रस्ते काँक्रीटीकरण, मिरकरवाडा जेटीला निधी मिळतोय. राजीवडा भागाला निधी मिळणार आहे. सगळे प्रश्न सोडविणार आहे. रिफायनरी पाहिजे की नको मुलांना रोजगार द्यायचा की नाही ते सांगा. रिफायनरीच्यां नावाने बोंबाबोंब करायची. रोजगार किती देणार ते सांगायचे नाहीं. सगळ्या नगरपालिका महायुतीचे असणार आहे. काही लोकांनी स्वतः ची पदे सांभाळावी. नितीन देसाई जायच्या अगोदर मला भेटलेले होते. त्यांचे नाव घेऊन आम्हाला बोलतात. आपण नऊ वर्षात काय केलेत हे जनतेला सांगा. आपसाताच झेंगट आहेत. तिथे बसलेले माणूस मनाने बसलेला होता. नाईलाजाने माणसे बसलेली होती. परवा जे व्यासपीठावर बसलेली होती त्यांना कुठच्या कुठच्या पद्धतीने केलेली आहे त्याबद्दल मी अजून तोंड उघडलेले नाही. इर्शाळ गड च्या निमित्ताने भावना प्रधान मुख्यमंत्री मी पाहिला. मी सुद्धा इर्शाळ गड वर गेलो होतो. संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. वैयक्तिक टीका म्हणजे किती टीका कराल. एवढी टीका होऊन देखील या टीकेला त्यांनी विकासाने उत्तर दिले आहे.
सामंत म्हणाले, फडणवीस साहेब देखील शिंदे साहेबांना मार्गदर्शन करतात. ज्याच्यावर संस्कार आहेत तो सहनशील असतो. जी घटना अजित दादांनी घडवली त्यानंतर काही लोकांची वाचाच गेली आहे. ४५ पेक्षा जास्त खासदार महायुतीचे निवडून येणार. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. निम्म्यापेक्षा जास्त लोक मुस्लिम भगिनी आज मेळाव्याला उपस्थित आहेत. सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढू. आजचा मेळावा संकल्प, शपथ घेण्याचा आहे. आमच्या कितीही टीका झाली त्याचा बदला आम्ही निवडणुकीच्या रिंगणात घेऊ. महायुतीचे ३० च्या ३० उमेदवार निवडून येतील. शिवसेना हे आपले कुटुंब आहे. कुटुंबात दगाबाजी करणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
मी महाराष्ट्राच्या सेवेसाठी दक्षिण कोरिया ला गेलो होतो. प्रत्येक वॉर्ड मध्ये कामे दिली आहेत. या कामांचा उपयोग जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी केला पाहिजे. आज नगरसेवक नसतानाही लोकांच्या संपर्कात आहेत. शहर तुम्हाला कधीही विसरणार नाही. वक्फ बोर्डाच्या संदर्भात छ. संभाजी नगरला जायला लागायचं. त्याचे कार्यालय रत्नागिरीत सुरू होणारं. वक्फ बोर्डाचे कॅम्प देखील रत्नागिरीत होणार. पासपोर्ट ऑफिस राजापूरला सुरू झाले आहे. मनापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देतो. जे कोण टीका करतात त्यांना भरपूर वेळ आहे. त्यांच्या नादाला आपण लागण्यात काही अर्थ नाही. आपण सगळ्या समाजाला न्याय द्यायचे काम करू.
उद्योग मंत्री या नात्याने मी सांगतो. कोकाकोला कंपनी लोटे परशुराम मध्ये सुरू होणार आहे. भारती शिपयार्ड सुरू झाला. येत्या वर्षभरात १० हजार कोटीचा प्रकल्प रत्नागिरीत सुरू केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पुढची नगर पालिका ही शिवसेनेचीच आहे असा आशावाद व्यक्त करतो. असे मनोगत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.