नादी लागलात तर पुन्हा ठेचेल:अनिल परब यांच्या टिप्पणीवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या- गरिमा फक्त महिलांनीच सांभाळायची का?…

Spread the love

*मुंबई-* ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार तो करू शकतो. सुषमा अंधारे जे बोलल्या त्यात त्यांची चूक नाही. त्यांची तेवढीच लायकी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 1756 आणि तुमच्या सारखे 56 नीच प्रवृत्तीच्या पुरुषांना मी रोज पायाला बांधून फिरते. आणि मी जे बोलले त्याचा मला अभिमान असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. आज ठेचले, पुन्हा नादी लागलात तर पुन्हा ठेचेल, अशा शब्दात त्यांनी अनिल परब यांना सुनावले आहे. सुषमा अंधारे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तुमचा नवरा तुमच्याच मुलाची डीएनएची टेस्ट करण्याची मागणी का करतो? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आव्हान देखील त्यांनी नाव न घेता दिले.

अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात विधान परिषदेत झालेल्या वादावर सुषमा अंधारे यांनी उडी घेतली होती. यावरुन चित्रा वाघ यांनी अनिल परब आणि अंधारे यांचा चांगलाच समाचार घेतला. या विषयी त्या म्हणाल्या की, त्यांनी ज्या पद्धतीने पोस्ट केली त्यामध्ये माझ्या कॅरेक्टर वर वेडेवाकडे बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न नेहमीच असतो. विरोधी पक्षातील आधीचे सर्व बोलून बोलून थकले आहेत आणि आता हे सुरू झाले आहेत. मात्र मला असा प्रश्न आणखी किती वर्ष विचारणार? माझ्या कॅरेक्टरला धरून एकच प्रश्न का विचारला जातो? तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? असे प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केले.

अनिल परब यांनी चित्रा वाघ असे नाव घेऊन, माझ्याकडे बोट दाखवून प्रश्न विचारला होता. त्यामुळे मी त्यांना उत्तर दिले. मात्र हा प्रश्न केवळ चित्र वाघ यांचा नाही. तर महिलांवर दादागिरी करण्याचा प्रश्न आहे. महिलांचा अपमान करायचा, त्यांच्यावर दादागिरी करायची, त्यांचा आवाज दाबायचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा संदेश मला द्यायचा होता. मात्र सटरफटर वाल्यांनी या वादात उडी मारली असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीतून घाणेरडे काहीतरी निर्माण करायचे आणि घाणेरडे बोलायचे असा आरोप त्यांनी केला.

*तुमचा नवरा डीएनए टेस्ट करायची मागणी करतोय…*

तुमचा नवरा तुमची मुले कोणाची आहे? याविषयी डीएनए टेस्ट करायची मागणी पत्रकार परिषद घेऊन करत आहे. तुम्ही आमचे बोलला तर आम्ही तुमचे बोलले तर चालेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काल मला विचारले गेले, माझे नाव घेऊन बोलले गेले, त्यामुळेच मी त्यांना उत्तर दिले असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहेत. मनीषा कायंदे या दिशा सालियन या विषयावर बोलल्या होत्या. मी हा विषय सभागृहात बोलले नव्हते. मात्र तरीदेखील अनिल परब यांनी माझे नाव घेऊन विषय काढला. तेव्हा त्यांना उत्तर देणे क्रमपात्र होते. मी जे बोलले त्याचा मला अभिमान असल्याचे चित्र वाघ यांनी म्हटले आहे.

*बोलायला विषय नसले की तुम्ही महिलांच्या कॅरेक्टरवर येता…*

आमचा नवरा काय करतो? आमची मुले काय करता? याच्याशी तुम्हाला काय करायचे. तुम्हाला मुद्द्यावर बोलायला सांगितले तेव्हा मुद्द्यावर बोला. तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर कशासाठी बोलणार? हे कोणत्या मानसिक देऊन होते. तुमच्याकडे बोलायला विषय नसले की तुम्ही महिलांच्या कॅरेक्टरवर येतात. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट का दिली? असा विषय होता. हा साधा प्रश्न होता. त्याचे उत्तर द्यायचे सोडून त्यांनी कॅरेक्टर वर प्रश्न उपस्थित केला. स्वतःला उत्तर देता आले नाही त्यामुळे त्यांनी सटरफटर लोकांना पुढे केले असल्याचा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केला. स्त्री आणि पुरुषाला जोडल्याशिवाय यांच्या डोक्यात काहीही नाही. त्यामुळे ज्याची जशी लायकी तसे विचार त्याच्या डोक्यातून येणार, असे देखील चित्र वाघ यांनी म्हटले आहे.

*शिवसेना प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंनी निरोप पाठवला होता…*

शिवसेना भवनावर मी लोळत होते, असा आरोप अंधारे यांनी केला. मात्र त्यावेळी सुषमा अंधारे या शिवसेनेत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी थोडी माहिती घ्यावी, असा सल्ला वाघ यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत माझ्यापर्यंत निरोप पाठवला होता. एकदा मला भेटायला मातोश्रीवर या. तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे आहेत, असा त्यांचा निरोप होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला मान देण्यासाठी मी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी मला मातोश्रीवर बोलावले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील तेथे उपस्थित होते. असा दावा देखील चित्रा वाघ यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर मला एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील घेऊन गेले होते. या सर्व घटना सत्य आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांच्यावर तुमचा विश्वास नसेल तर मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे यांना विचारा, असे आव्हान देखील चित्रा वाघ यांनी दिले आहे.

*बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसत तीचे दर्शन घेतले…*

माझी अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसत होते, त्या खुर्चीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मातोश्रीवर गेल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना तशी विनंती देखील केली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्वतः मला त्या खुर्चीपर्यंत लिफ्टमध्ये बसवून नेले. बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसत होते, त्या खुर्चीचे दर्शन मला घ्यायचे होते. बऱ्याच वर्षापासूनची इच्छा तिथे पूर्ण झाली. त्यामुळे बोलण्याआधी थोडा विचार करा, असे आव्हान देखील त्यांनी सुषमा अंधारे यांना दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page