तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? तर अजिबात कोणालाही सांगू नका ? कारण हे असतात देवांचे शुभ संकेत …

Spread the love

तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहेत ही स्वप्ने जर तुम्हाला पडत असतील तर त्या मागचा संकेत हा शुभ आहे की अशुभ आहे? तसेच ही स्वप्ने तुम्ही कोणालाही सांगायची देखील नाहीत. तर अशी ही स्वप्ने नेमकी कोणती आहे चला तर मग जाणून घेऊयात.

तर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती मृत पावलेली व्यक्ती दिसली तर हा आपल्यासाठी शुभ संकेत असतो. बऱ्याच वेळा मृत व्यक्ती किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आपण स्वप्नामध्ये पाहतो आणि आपण खूपच घाबरतो आणि आपणाला अनेक विचार येत राहतात.

परंतु हे स्वप्न खूपच शुभ असते. म्हणजेच त्या माणसाचे आयुष्यमान वाढणार हे नक्की. म्हणजेच त्याचे आयुष्य वाढणार आहे हा त्या मागचा संकेत असतो. त्यामुळे तुम्ही अशी स्वप्ने पाहिला तर घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा. तसेच जर स्वप्नामध्ये तुम्हाला सापाचे दर्शन झाले तर आपण खडबडून जागे होतो आणि आपण खूपच भयभीत होतो. परंतु हे स्वप्न देखील आपल्यासाठी खूपच शुभ असते.

यामुळे आपल्याला शंकरांचा आशीर्वाद मिळत असतो. मग त्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या घराजवळ एखादे शंकराचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शंकरांच्या पिंडी वरती बेलपत्र अवश्य अर्पण करायचे आहे. तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा किन्नर दिसला तर हा देखील शुभ संकेत असतो.

तसेच आपण आपल्या आजूबाजूला कधीही किन्नर दिसला की आपण त्याला पैसे देतो. तर तुम्ही देखील पैसे देत असताना काही वेळेस आपण सुट्टे पैसे देणे खूपच गरजेचे असते. बरेच जण नोटा वगैरे देत असतात. तुम्ही एखादी दहा रुपयाची नोट देऊ शकता आणि त्याच्याकडून तुम्ही परत एखादा नाणे त्याच्याकडून मागून घेऊ शकता आणि हे नाणे तुम्ही आपल्या तिजोरी मध्ये ठेवू शकता.

यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यामुळे स्वप्नामध्ये किन्नर दिसणे हे आपल्यासाठी शुभ असते. तसेच एखादे लहान मुल आपण जर स्वप्नामध्ये पाहिले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. लहान मुले देवाचे रूप मानले जाते आणि तर तुम्हाला स्वप्नांमध्ये लहान मुल दिसले तर आपला वरती देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आहे हे नक्कीच समजावे.

तसेच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखाद्या देवाचे दर्शन झाले म्हणजेच कोणत्याही देवी देवतांचे तुम्हाला जर दर्शन झाले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो. यावरून तुम्ही समजून जा की, आपल्या कुटुंबीयांवर देवी देवतांचा आशीर्वाद आहे. ते आपल्या घरी वास करत आहेत.

तर मित्रांनो ही जी स्वप्न होती ही स्वप्ने जर तुम्ही पाहिली तर ही सर्व काही शुभ स्वप्न आहेत आणि ही स्वप्ने तुम्ही कोणालाही अजिबात सांगू नका. या स्वप्नामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तसेच तुमचे येणारे दिवस हे खूपच सुखाचे असणार आहेत. हा त्या मागचा संकेत असतो. त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतेही स्वप्न पडले तर तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा. कारण हा आपणासाठी खूपच शुभसंकेत असतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page