
सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
नवी दिल्ली- महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे सत्ता संघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निमित्ताने नबाम रेबिया प्रकरणाचा विषय सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय खंडपीठाने घेतला आहे. सरन्यायाधीस धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश एम. आर शाह, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायाधीश, हिमा कोहली, न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला.
यावेळी न्यायालयाने महत्वाचं निरक्षण नोंदवलं आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं,” असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.