ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरातील तूप आणि मिठाचा वापर करून एक ड्रिंक तयार करा. बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल. रात्री जेवल्यानंतर साधारण एक तासाने तुम्ही या पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही.
१ चमचा देशी तूप आणि अर्धा चमचा सैंधव मीठ कोमट पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी हळूहळू प्या. नैसर्गिक घरगुती उपाय असल्यामुळे याचा तुम्हाला त्रास होणार नाही.
काहीही खाल्ल्यानंतर जर पोट सतत भरल्यासारखे वाटते अथवा पोट फुगल्यासारखे दिसून ब्लोटिंगची समस्या दिसत असेल तर गरम पाणी पिण्याने तुम्हाला यापासून सुटका मिळेल. गरम पाण्यात तुम्ही १ चमचा बडिशेप मिक्स करा आणि हे पाणी प्या.
अपचनाचा त्रास झाल्याने सतत आंबट ढेकर येत राहतात. यासाठी तुम्ही जेवल्यानंतर दह्याचे ताक करून प्यावे. ताकामुळे अॅसिड रिफ्लेक्स आणि अपचनाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
दह्यामध्ये पाणी मिक्स करून घुसळून घ्या. या ताकामध्ये सैंधव मीठ, भाजलेली जिरे पावडर, किसलेले आले आणि पुदिन्याची पाने मिक्स करून हे ताक प्यावे. पचनक्रिया यामुळे चांगली होते आणि अपचनाचा त्रास होत नाही. ताक हा आयुर्वेदातील अत्यंत उत्तम उपाय आहे.हगवण, डायरिया अथवा लुज मोशन्स अशा कोणत्याही पोटाच्या समस्येच्या बाबतीत आल्याचे पाणी उत्तम उपाय ठरते. एक कप पाणी गरम करा. त्यात आलं किसून घाला आणि त्यात बडिशेपेचे पाणीही वेगळं गरम करा. त्यानंतर हे दोन्ही गाळून तयार झालेला चहा तुम्ही पिण्यामुळे लुज मोशन्ससारख्या समस्येपासून सुटका मिळेल.अपचनाचा त्रास अधिक वाढत चालला आहे. तरूण पिढीलाही हा त्रास सतावत आहे. यासाठी आपल्या आहारात सुधारणा करणे गरजेचे आहे. यासाठी ताज्या फळांचा आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करून घ्या. तसंच या भाज्यांमध्ये लसूण, आलं, बेसिल (तुलसी) लिव्ह्जचाही वापर करावा. या सर्व वनस्पती अपचनासारख्या समस्या दूर होतात.