शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर शरीरात वाढते चरबी, लगेच करा ‘हे’ खास उपाय…..!

Spread the love

एक्सपर्टनुसार, एक्सरसाइज आणि डाएटनंतरही तुम्हाला वजन कमी करण्यास अडचण येत असेल तर अनेकांना निराशा येते. या कारणाने तुमचं मेटाबॉलिज्म कमी होतं. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म मजबूत असतं फार महत्वाचं आहे हे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ मेटाबॉलिज्म कमी झालं हे कसे ओळखाल.

🔹️मेटाबॉलिज्म म्हणजे काय…?

मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचे देखील नियंत्रण केले जाते.

🔹️मेटाबॉलिज्म कमी झाल्याची लक्षणे…

▪️1) सतत होणारी अंगदुखी…
जर तुम्हाला सतत मांसपेशी आणि शरीरात वेदना होत असतील तर तुमच्या थायरॉईड ग्रंथी योग्य काम नसाव्यात असं होऊ शकतं. थायरॉयड ग्लॅंड योग्य प्रकारे काम करत नसल्यानेही मेटाबॉलिज्म कमी होतं. त्यामुळे सतत होणाऱ्या अंगदुखीकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

▪️2) सतत थकवा…
जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म रेट स्लो होतं तेव्हा तुम्हाला प्रत्येकवेळी थकवा जाणवायला लागेल. मेटाबॉलिज्म स्लो झाल्याने तुमच्यात शारीरिक संबंध ठेवण्याचीही इच्छा होणार नाही. त्यामुळे आहारात मेटाबॉलिज्म रेट वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे योग्य ठरेल. दिवसातून काही वेळा थोड्या थोड्या वेळाने हे पदार्थ खावेत.

▪️3) पोटाचा घेर कमी न होणे…
जेव्हा शरीराचं मेटाबॉलिज्म रेट कमी होतो तेव्हा जास्त काही न खाताही तुमच्या पोटाचा घेर वाढू लागतो. अशात वजन कमी करण्याचे सर्व प्रयोग निकामी ठरत असल्याचं दिसतं. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की, अचानक तुमचं वजन वाढलं आहे तर वेळीट मेटाबॉलिज्म रेट तपासून घ्यावा.

▪️4) भूक न लागणे…
जर तुम्हाला सकाळी नाश्त्यावेळ भूक लागत नसेल आणि तुम्ही दुपारच्या जेवणापर्यंत काही न खाता सहज राहू शकता. तर तुमचा मेटाबॉलिज्म रेट स्लो झाला आहे.

🔹️मेटाबॉलिज्म वाढवणारे उपाय…

▪️कच्ची हळद…
NLM वर प्रकाशित एका शोधनुसार, हळद मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर असते. यात करक्यूमिन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात जे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. हळदीच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.

▪️भिजवलेले बदाम…
बदामामध्ये मॅग्नेशिअमचं भरपूर प्रमाण आहे. जे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतं. असं बघण्यात आलं की, जे लोक नियमितपणे भिवजलेले बदाम खातात त्यांचा मेटाबॉलिज्म रेट हाय असतो. त्यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि वजनही कमी होतं.

▪️दालचीनीचा चहा…
मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी दिवसाची सुरूवात दालचीनीच्या चहाने करू शकता. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर अशतात आणि शरीराचा मेटाबॉलिक रेटही वेगाने वाढतो. दालचीनीने तुम्ही शरीरातील एक्स्ट्रा फॅटही दूर करू शकता.

▪️टोमॅटो सूप…

टोमॅटोमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व असतात, जे शरीर ताजंतवाणं ठेवतात. टोमॅटो सूपमध्ये असलेलं लायकोपीन नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट इम्यूनिटी पॉवरही वाढतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट करतं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page