
अमरावती- काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात परतल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं बोललं जात आहे. मात्र,यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून आता २० तारखेपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार झाला तर ठीक नाहीतर २०२४ नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी मिश्किल प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार हा खरच होणार की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून आता वीट आल्याचेही बच्चू कडू यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. मात्र,अशात दिल्लीवारीहून परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रीमंडळ विस्तार कधी करायचा याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करतील असं वक्तव्य केलं आहे.