
रत्नागिरी ; रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचं काम गेल्या सहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रखडलेल्या कामा विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहेआज शहर बस स्थानकात मनसेनं मोर्चा काढला रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक झाला. बस स्थानकात गुराचं प्रतिकात्मक पुतळे दाखवून निषेध व्यक्त केला.एसटीच्या अधिका-यांना मनसेकडून निवेदन देण्यात आले. पुढील वीस दिवसात दखल घेतली नाही तर गुरे बस स्थानकात बांधून गुरांचा गोठा असल्याचं जाहीर केलं जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला.
या मोर्चाला मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर , मनसे प्रवक्ते योगेश चिले, जिल्हा संपर्क अध्यक्ष मनिष पाथरे, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात


