रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. याच मतदारसंघात २००९ रोजी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा विजय झाला होता. मात्र २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा विनायक राऊत यांनी निलेश राणेंना आव्हान दिलं आहे.
निलेश राणेंना आम्ही कधीच गीणतीत पकडत नाही. मात्र माझं निलेश राणंना आव्हान आहे…ईजा, बिजा, तिजा.. तिसऱ्यांदा आपटायचे असेल, तर त्यांनी निवडणुकीत उभे रहावे, असं आव्हान विनायक राऊत यांनी निलेश राणेंना दिले आहे. तसेच पराभवाला आमच्या शुभेच्छा आहेत, असंही विनायक राऊतांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे विनायक राऊतांच्या या टीकेवर निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.