संगमेश्वर:- श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकरवाडी आयोजित वार्षिक सत्यनारायणाची पूजा नुकतीच संपन्न झाली.या वेळी मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
गाव विकास समितीच्या कार्याची दखल घेत गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
आपले मनोगत व्यक्त करताना मुझम्मील काझी यांनी म्हटले की,जर प्रत्येक गावाने गाव विकास समितीचे व्हिजन राबवले तर गावे अधिक सुजलाम सुफलाम होतील. गाव विकास समितीचे व्हिजन हे प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये राबवले गेले पाहिजे तरच लोकांच्या समस्या सुटतील.
मुझम्मील काझी यांनी पुढे सांगितले की, संघटन प्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी गाव विकास समितीचे कार्य सुरू आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम जोमाने सुरू आहे.
गाव विकास समिती विविध उपक्रम राबवत असते.नुकतेच निवळी येथे गाव विकास समिती चे शिलेदार दैवत पवार यांच्या माध्यमातून ४५ वर्षांवरील ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि दर वर्षी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे ही व्हिजन गाव विकास समितीने राबवले आहे.
परचुरी येथील ग्रामस्थांना आवाहन करताना मुझम्मील काझी यांनी सांगितले की जर तुमची इच्छा असेल आणि गाव विकास समितीचे व्हिजन राबवायचे असेल तर कधी ही गाव विकास समितीला हाक द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.जी जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत.
काझी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना परचुरी गावच्या सरपंच सौ.शर्वरी वेल्ये यांनी सांगितले की गाव विकास समितीने एक हात मदतीचा पुढे केला आहे तर आम्ही ही दुसरा हात मदत घेण्यासाठी नक्की पुढे करू.
या वेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.शर्वरी वेल्ये,उपसरपंच प्रदीप चंदरकर, उक्षी गावचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर, माजी उप सरपंच हरिश्चंद्र बंडबे,मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चंदरकर, वाडी प्रमुख शांताराम चंदरकर तसेच बंडू कळंबटे, जगन्नाथ दुदम,दीपक लिंगायत,वसंत लिंगायत, भिकाजी कळंबटे,अनंत शिंदे,चंद्रकांत लिंगायत,दर्शन पाटील, इत्यादी मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.