रत्नागिरीचे श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टच्या ग्रामदेवता नवलाई पावणाई देवीनंच्या मंदिराची मूर्ती मिरवणूक
नवलाई पावणाई प्रतिमेची रथातून काढण्यात येणार आहे भव्य मिरवणूक.
रत्नागिरी: रत्नागिरीची ग्रामदेवता व १२ वाड्यांची मालकीण श्री नवलाई पावणाई देवीच्या प्रतिमेची रथातून गुरुवार सायंकाळी ०५:०० वाजता दि.१६/०२/२०२३ भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल पथक, ढोल ताशांच्या गजराने उत्साहात साजरा करायची आहे.
मिरवणुकीचा मार्ग भैरी मंदिर मुरलीधर नाका काँग्रेस भुवन कडून टिळक आळी झाडगाव नाका जोगेश्वरी मंदिर भैरीच्या साहणेमागून झाडगाव नाक्यावरून गाडीतळ जुनी तांबट आळी येथून नवलाई पावणाई मंदिराच्या येथे समाप्त होईल रात्री १०:०० ( दहा ) वाजता.
सर्व मंदिराचे मानकरी, गावकरी, ग्रामस्थ व रत्नागिरी परिवार सर्वांनी उपस्थित राहावे. असे आव्हान श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर, ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. अध्यक्ष
भैरी देवस्थान