पुणे- राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सभा घेत आहेत. यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे. यासाठी उपोषण केले असून याच ठिकाणी जरांगेंनी काही दिवसांपूर्वी विराट सभा घेतली होती. आज (२० ऑक्टोबर) दिवशी जरांगे-पाटलांनी पुण्यातील राजगुरूनगर येथे सभा घेतली आहे. या विराट सभेमध्ये लाखो मराठा समाज बांधवांनी उपस्थिती दाखवली होती. सभेपूर्वी जरांगेंनी शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. दुपारी १ ते २ दरम्यान जरांगे-पाटील यांनी भाषणाला सुरूवात केली.
जरांगे-पाटील सभेत बोलण्यापूर्वी क्रांतीसुर्य असा उल्लेख करण्यात आला होता. यावेळी सरकावर सडकून टीका करत ते म्हणाले की, सरकारने एक महिना आरक्षणासाठी मागितला होता. तरीही अजूनही कोणतीच भूमिका बजावली नाही. एकूण ५ हजार मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे आहेत. यावर शांततेच्या मार्गाने लढाई असणार आहे. यासाठी उद्यापासुन आपल्याला कामाला लागायचे आहे. एकानेही आत्महात्या करायची नाही. आत्महात्या केल्याने कर्ता पुरूष जातो, मग असे जर होणार असेल तर आरक्षण द्यायचे कोणाला आणि सभा घ्यायची कशाला? असा सवाल जरांगेंनी भाषणातून मराठा बांधवांना केला आहे.
मराठ्यांशी गद्दारी करणार नाही
सभेत बोलत असताना जरांगेंनी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असे वक्तव्य केले आहे. जर मला गद्दारी करायची असती तर कधीच केली असती. माझे तुम्हाला एक सांगणे आहे की, मराठ्यांसाठी एक इंचही मी मागे हटणार नाही. शांततेचे युद्ध मराठ्यांना न्याय देईल, असे जरांगे-पाटील यांनी सभेच्या भाषणात वक्तव्य केले आहे. त्यानंतर कुणबी आणि मराठा एक असल्याचे सांगितले. शेती करणारा व्यक्ती म्हणजे कुणबी असल्याचे जरांगे-पाटील सभेत म्हणाले आहेत.
शेती करणारा व्यक्ती म्हणजे कुणबी
सभेतील भाषणात जरांगेंनी कुणबी या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. ते म्हणाले की, शेती करणारी व्यक्ती म्हणजे कुणबी आहेत. काळानुसार बोलीत बदल होऊ लागला आहे. पूर्वी लोकं चप्पलला वाहन म्हणायचे. आता लाेकं चप्पल बोलायला लागले आहेत. आशाचप्रकारे कुणबी म्हणजे शेती करणारा तर आता लोकं शेतकरी म्हणू लागले आहेत.
सुनिल कावळेंना वाहिली श्रद्धांजली
(१९ ऑक्टोबर) या दिवशी जालना जिल्ह्यातील अंबड येथील राहणाऱ्या सुनिल कावळेंनी मुंबईत जाऊन आत्महेत्या केली. सुनिल कावळे यांचे वय हे ४५ होते. आज झालेल्या पुण्यातील राजगुरुनगर येथील झालेल्या मराठा मोर्च्या आंदोलन सभेत दिवंगत मराठा आंदोलक सुनिल कावळे यांना श्रद्धांजली वाहून सभेची सांगता करण्यात आली. यानंतर पुढील होणारी सभा हि बारामती येथील तीन हत्ती चौकात होणार आहे.