जळगाव: तुम्ही माझ्यासोबत काम केलं आहे. आदर होता, सन्मान होता. आता तेच इतके माझ्या मागे लागले. दोन-दोनदा अँटी करप्शन लावलं. जेलमध्ये टाकू, अटक करू. पण मी केलं काय ? गुंड, चोर, खुनी तुमच्याबरोबर बसतात. मी यातल काय केलंय? पण मी भाजप सोडलं हेच जिव्हारी लागलं आणि आता मला संपवायचं, मला जेलमध्ये टाकायचं हे एकमेव सुरू आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर केला. ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ठीक आहे जे होईल ते होईल. मी तर काही केलं नाही पण जबरजस्ती अडकवण्याचं काम सुरू आहे. आजचं जे चित्र आहे ते बदलत आहे. आजचे लोक आहे स्वार्थी आहेत. ग्रामपंचायती खाऊन जातात. गणित बिघडवून जातात. असं त्यांनी यावेळी भाजपवर आरोप करताना म्हटलं आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जामीन मंजूर मिळाला आहे. कारण, विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा २०१६ च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात १ लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती दिली. न्यायालायने मंदाकिनी खडेस यांना विनापरवानगी देश सोडू नये, असे आदेश दिले आहेत. शिवाय न्यायालयाकडून त्यांना जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा त्यांना तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावे लागणार आहे. आणि पुराव्यांशी छेडछाड करू नका, असेही न्यायालयाने सांगितले आहे.