मुंबईतील माणुसकी अद्याप जिवंत आहे!!
मालाड आप्पा पाडामधील कुटुंबाना एक हात मदतीचा…

Spread the love

एक मेकाय सहाय्य करू…अवघे धरू सुपंथ

मुंबई :प्रतिनिधी (विनोद चव्हाण)
मुंबईतील मालाड पूर्व येथे असलेल्या आप्पा पाडा येथील आनंद नगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत १५ ते २० गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. आगीत एकाचा मृत्यू झाला असून आप्पा पाडा झोपडपट्टीला भीषण आगी मध्ये बाराशे कुटुंब भुईसपाट झाली. या कुटुंबाच्या मदतीचा स्वप्नपूर्ती को ऑप हौसिंग सोसायटी आर ५ पूनम नगर अंधेरी पूर्व मधील रहिवाशी यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकांनी स्वताच्या घरतील धान्य, भांडी, कपडे आणि जे शक्य होईल तेवढी मदत करण्याचा निश्चय रहिवाश्यांनी केला.

आप्पा पाडा मालाड पूर्व येथे अनेक कष्टकऱ्यांचे आगेत घर जळून राख झाले त्या कुटुंबांनी आयुष्यभर कमवलेली शोदोरीची फक्त राख पाहताना डोळ्यात अश्रू येत होते. तसेच आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती म्हणून स्वप्नपूर्ती को ऑप हौसिंग सोसायटी आर ५ मधील सदस्य यांनी कपडे, धान्य, भांडी, बिस्कीट इत्यादी साहित्य वाटप केले. त्याच प्रमाणे लहान मुलांच्या कपड्या पासून प्रौढ व्यक्तीना लागणाऱ्या कपड्या पर्यंत साहित्य देण्यात आले. हि मदत देताना सम्यकच्या टीम ने स्थानिक सर्वे केला होता त्या प्रमाणे वंचित राहिलेल्या लोकांपर्यंत आम्ही पोहचू शकलो.

आठवड्याची सुट्टीचा दिवस असताना आम्ही वेळात वेळ काढून मालाड मधील आप्पा पाड्यात पोहोचलो आणि सर्व चाळी मध्ये जाऊन लोकांसोबत संवाद साधून त्यांना आमच्याकडे असणाऱ्या साहित्य जिवनावश्यक वस्तू त्यांना गरजेनुसार देत होतो. ज्यांना साहित्य मिळाले आहे ते नको म्हणून सांगत होते. असे हि चित्र आम्हाला पाहायला मिळाले. आमच्या सोसायटीचा प्रत्येक्ष गरजू कुटुंबा पर्यंत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न व अनुभव होता असे स्वप्नपूर्ती को ऑप हौसिंग सोसायटी मधूल महिला, पुरुष व तरुण कार्यकर्ते म्हणाले. अजून या ठिकाणी (चटई, ताडपत्री) साहित्याची गरज आहे. कृपया सर्वांनी मदत करावी असे आव्हान महेश शेलार यांनी केले आहे.

संपर्क :महेश शेलार ९००४७४०८२४

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र

RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page